‘बहादूर थापा आणि इतर कविता’ : लेबल न लावलेली किंवा न लागलेली कविता
मी लेबल न लावलेली, कवितापणाचा नट्टापट्टा न केलेली कविता शोधत असतो आणि एक वाचक म्हणून मी लेबलं लावलेली कविता वाचायचं टाळतोच. हे माझं अल्पमती निरीक्षण मांडण्याला कारण म्हणजे ‘बहादूर थापा आणि इतर कविता’ हा संतोष पद्माकर पवार यांचा संग्रह. ही लेबल न लावलेली किंवा न लागलेली कविता आहे, असं माझं मत आहे.......